Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Sanugrah Yojana l अपघातग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार देणार २ लाख..।

Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Sanugrah Yojana २०२३-२४ पासून महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केली आहे. या योजने अंतर्गत काही अपघात व दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबांना सरकार आर्थिक सहाय्य देते. जसे की आपण जाणतो विज पडून, सर्पदंश, विंचू दंश, पूर, रस्त्यावरील अपघात अशा अनेक कारणांमुळे शेतकरी दुर्दैवी मृत्युमुखी पडतात किंवा अपंग होत अशा शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला अर्थीक मदत करण्याचे काम या योजने मार्फत केले जाते.

Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Sanugrah Yojana

Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Sanugrah Yojana

  • दैनंदिन कामे करताना बरेच शेतकरी अपघात ग्रस्त होत असतात अशा वेळी त्यांच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब त्रस्त होते.
  • अशा कुटुंबाना मदत करण्याचे काम ही योजना करते.
  • जर एखाद्या कुटुंबातील फक्त एक च व्यक्ती या योजने मध्ये रजिस्टर्ड असला तरी त्या कुटुंबातील इतर व्यक्तीनं सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • ही एक स्वतंत्र योजना आहे हिचा इतर कोणत्याही योजनेशी संबंध नाही, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा आणखी कोणता विमा असेल तरी त्याला या योजनेचा लाभ हा मिळतोच.

अधिकृत वेबसाइट: https://krishi.maharashtra.gov.in/

फायदे

  1. अपघाती दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास २ लाख रुपयांचे साहाय्य मिळते.
  2. शेतकरी अपंग झाल्यास १ ते २ लाखाची मदत मिळते.
  3. एक हात किंवा एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास १ लाख रुपयांचे सहाय्य मिळते.
  4. दोन हात किंवा दोन पाय किंवा दोन डोळे किंवा एक हात एक पाय निकामी झाल्यास २ लाखांचे सहाय मिळते.

पात्रता

  • अर्जदार शेतकऱ्याचे वय हे १८ ते ७५ वर्ष असावे.
  • अर्जदारकडे त्याच्या शेतजमिनीचा ७/१२ असावे आवश्यक आहे.
  • राज्यातील सर्व शेतकरी या योजनेस पात्र आहेत.
  • महाराष्ट्र राज्यातील सर्व विहितीधारक खातेदार शेतकरी म्हणून नोंद असलेला एक सदस्य तसेच त्यांच्या कुटुंबातील विहितीधारक शेतकरी म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य असे एकूण २ जण Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Sanugrah योजनेस पात्र आहेत.
  • कुटुंब सदस्यांमध्ये शेतकऱ्यांचे आई वडील, पती/ पत्नी, भाऊ किंवा अविवाहित बहीण यांचा समावेश होतो.
  • या योजने अंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्याने किंवा त्याच्या वारसाने इतर कोणत्याही अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अपघातग्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास खालील क्रमानुसार त्याच्या वारसदाराना अनुदानाची रक्कम मिळाले

  1. अपघातग्रस्त शेतकऱ्याची पत्नी किंवा अपघात ग्रस्त स्त्री शेतकऱ्यांचा पती.
  2. अपघातग्रस्त शेतकऱ्याची अविवाहित मुलगी.
  3. आई.
  4. मुलगा.
  5. वडील.
  6. सन.
  7. अन्य कायदेशीर वारसदार.

योजने मध्ये कोणत्या बाबी समाविष्ट आहेत

  • रस्ता किंवा रेल्वे अपघात.
  • पाण्यात बुडून मृत्यू होणे.
  • जंतू तसेच कीटकनाशके हाताळताना झालेले विष बाधा.
  • विजेचा धक्का बसून झालेला अपघात.
  • वीज पडून मृत्यू.
  • उंचावरून पडून झालेला अपघात किंवा मृत्यू.
  • खून.
  • सर्पदंश अथवा विंचूदंश.
  • जनावरांच्या हल्याने झालेला अपघात, मृत्यू.
  • नक्षली संघटनाच्या हल्यात झालेला मृत्यू.
  • बाळंतपणातील मृत्यू.
  • दंगलीत झालेला मृत्यू.
  • अन्य कोणताही अपघात.

योजने मध्ये समाविष्ट नसलेल्या बाबी

  • नैसर्गिक रित्या झालेला मृत्यू.
  • विमा उतावण्या आधीचे अपंगत्व.
  • आत्महत्येचा प्रयत्न.
  • जाणीव पूर्वक स्वतःला इजा पोहचवणे.
  • आमली पदार्थांच्या नशेत असताना झालेला अपघात.
  • कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात.
  • भ्रमिष्टपणे घडलेला अपघात.
  • सैन्यदलातील नोकरी मध्ये झालेला अपघात.
  • शरीर अंतर्गत रक्तस्राव.
  • मोटर शर्यतीत झालेलं अपघात.
  • जवळच्या लाभधारकातून खून.

How to apply

  • अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्याच्या वारसाने सर्व आवश्यक कागदपत्रे अपघात झाल्यापासून ३० दिवसाच्या कालावधीच्या आत तालुका कृषी विभागामध्ये जमा कारणे आवश्यक आहे.
  • अपघातग्रस्ताची प्राथमिक तपासणी करून तालुका कृषी विभाग, रिव्हेन्यू विभाग, स्थानिक पोलिस यांनी एक अहवाल आठ दिवसांच्या आत जिल्हा कृषी विभागास कळवला जातो.
  • तालुका कृषी विभाग अनुदासाठी अर्ज तपासून घेऊन विहित अर्ज तहसीलदारांकडे पाठवतात.
  • नंतर ३० दिवसाच्या आत संबंधीत तहसीलदारांच्या अध्यक्ष्यते खाली अनुदान देण्याचा निकाल लावला जातो.

अधिक वाचा : https://govtschemesin.com/bhausaheb-fundkar-falbag-lagvad-yojana/

https://govtschemesin.com/lek-ladki-yojana/

Leave a Comment