Bachat Gat Loan Maharashtra ही योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबवली जात आहे.
सध्याच्या स्थितीला राज्यात महिला बचत गट जास्त प्रमाणात कार्यरत आहेत. अशा बचत गटांप्रमाणे दिव्यांग बचत, शेतकरी महिला पुरुष बचत गट, कृषी उत्पादक बचत गट देखील असतात त्यानं देखील या योजने अंतर्गत कर्ज मिळते.
ही योजना अशा सर्व बचत गट सदस्यांसाठी खूप उपयुक्त आहे. सध्या महिलावर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. महिलांनी पुढे जावे त्यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून महिला स्वतःचा उद्योग सुरु करतील आणि स्वतःचा आर्थिक विकास करू शकतील.
आता कित्येक लोक, बचत गटाच्या साह्याने आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुढे आलेले आहेत. परंतु बऱ्याच लोकांना या योजना माहीत नसतात त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
आज आम्ही तुम्हाला बचत गटातील कर्ज योजने बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत, तुम्ही एक बचत गट सदस्य असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठीच्या कर्जासाठी फिरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होऊ शकतो, त्यामुळे या लेखातील माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
Bachat Gat Loan Maharashtra काय आहे?
Bachat gat loan ची सुरुवात भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महारष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.अल्पसंख्याक समाजातील महिलांना/ पुरुष या योजनेसाठी उद्योग सुरू करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
Bachat Gat Loan Maharashtra योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Bachat Gat Loan Maharashtra योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा 4 टक्के आहे. तसेच योजनेची परतफेडीचा कालावधी हा तीन वर्षे आहे.या योजनेचा हेतू बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना/ पुरुषांना कर्ज पुरवठा करणे हा आहे.
- या योजनेअंतर्गत बचत गट सदस्यांना ९५% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो.
- राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील बचत गट सदस्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत बचत गटातील सभासदांना प्रत्येकी रुपये 25,000 हजार आहे.
Bachat Gat Loan Maharashtra Beneficiary लाभार्थी
- राज्यातील बचत गटातील सदस्य या योजनेचे लाभार्थी आहेत.
Bachat Gat Loan Maharashtra उद्देश
- राज्यातील बचत गटातील सदस्यांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा सदस्यांनास्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्ये उद्दिष्ट्य आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे, आणि महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करणे.
- ज्या बचत गटांनी, गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने व्यवसाय सुरु केला आहे, अशा व्यवसाय करत असलेल्या महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे व त्यांना सक्षम करणे या करिता या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- महिलांचे जीवनमान सुधारणे व महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे हे महिला समृद्धी कर्ज योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्या सक्षम व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील बचत गटातील गरीब,होतकरू,परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील व राज्यातील इतर तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करतील या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे.
- राज्यातील होतकरू व कष्टाळू नागरिकांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने Bachat Gat Loan योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
Bachat Gat Loan Eligibility पात्रता
1) सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी हा मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे,
2) बचत गट आणि समाजातील मागासवर्गीय घटकांतील महिला उद्योजक या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
3) लाभार्थी बीपीएल(दारिद्र्य रेषेखालील) श्रेणीतील असावेत.
4) कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.
5) लाभार्थ्याचे किमान वय 18 ते 50 वर्षांतील असावे.
6) कर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रुपये 98 हजार तर, शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे 1 लाख 20000 रुपये पर्यंत असावे.
7) केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
8) बचतगट स्थापन होऊन किमान ०२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला पाहिजे.
9) अर्जदार बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
Bachat Gat Loan योजनेच्या अटी
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरीलसदस्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- Bachat Gat Loan ९५% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो परंतु काही वेळेस राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेस स्वतःकडील ५% रक्कम भरावी लागेल.
- कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेला कर्जाचा उपयोग ४ महिन्याच्या आत करणे अनिवार्य आहे.
- Bachat Gat Loan योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २० लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्यावरील रक्कम लाभार्थीस स्वतःकडील भरावी लागेल.
- अर्जदार कुठल्याही बँकेची किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची थकबाकीदार असता कामा नये.
- अर्जदार या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा अर्जदारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- Bachat Gat Loan योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ३ वर्षाच्या आत परत करणे आवश्यक आहे.
- अर्जदार अर्जात खोटी माहिती भरून सदर योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेवर दंडात्मक कारवाई करून योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल.
- Bachat Gat Loan योजनेअंतर्गत अर्थसहाय्य किमान ५,३,२ वर्षे पूर्ण झालेल्या व नियमित मासिक बचत असणाऱ्या महिला बचत गटास दिले जाईल
- अर्थसहाय्य गट स्थापन करुन किमान ४ वर्षे पूर्ण झालेल्या व नियमित मासिक बचत असणाऱ्या व सामुदायिक व्यवसाय अथवा गटातील किमान ५०% सदस्या व्यवसाय करत असणा-या महिला बचत गटास मिळू शकेल.
- महिला बचत गटांनी त्यांचे बचतीच्या संबंधात लेख्यांच्या नोंदी अद्यावत ठेवलेल्या असाव्यात.
- महिला बचत गटांची मासिक बैठक नियमीत व बचतीसाठी जमा करण्यात येणाऱ्या बचतीची मासिक वर्गणी नियमीत भरणा केलेली असावी. याबाबत ठरावाच्या नोंदीची छायाप्रत सादर करणे बंधनकारक राहील.
- या निधीचा उपयोग महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या उद्योगाच्या/व्यवसाच्या सक्षमीकरणाकरीता करण्यात यावे.
- बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बैंक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक (गव्हर्नमेंट अंडरटेकींग) यामध्ये असेल त्या बचत गटांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- अशा प्रकारचे अर्थसहाय्य एकदाच गटाला मिळू शकेल.
- सदर योजनेचा लाभ गटामार्फत सुरु असलेल्या व्यवसाय तसेच त्यांच्या बचतीच्या लेख्याची तपासणी केल्यानंतर पात्र ठरेलल्या महिला बचत गटास देण्यात येईल.
- दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजुर करणे अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार मा.आयुक्त यांना राहील.
Bachat Gat Loan Maharashtra आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- बँक खाते(अर्जदार स्वतःच्या बँकेचा तपशील देणे गरजेचे आहे कुटुंबातील इतर कोणत्या सदस्यांच्या बँक खात्याचा तपशील चालणार नाही.)
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सेल्फ ग्रुप मेंबर्शिप आयडी कार्ड
- रहिवासी पुरावा (विज बिल किंवा रेशन कार्ड)
- ओळख पुरावा (मतदार ओळखपत्र)
- अर्ज
- जन्म प्रमाण पत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक
- बचत गटाच्या पॅनकार्डची प्रत जोडणे आवश्यक राहील.
- महिला बचत गटामधील सर्व महिलांची यादी सोबत जोडणे आवश्यक राहील.
- महिला बचत गटांची मासिक बैठकीत जमा करण्यात येणाऱ्या बचतीची मासिक वर्गणीच्या नोंदीची छायाप्रत सादर करणे बंधनकारक राहील.
- बचत गटामार्फत करत असलेल्या व्यवसायाचा तसेच त्यापासून मिळत असलेल्या मासिक उत्पन्नाचा तपशिल सोबत जोडणे आवश्यक राहील.
- व्यवसायासाठी वापरात असलेल्या जागेबाबतचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक राहील.
- बचत गटाच्या बँक पासबुकची खाते सुरु केल्यापासून आजतागायत प्रती सोबत जोडणे आवश्यक राहील,
- अर्जासोबत तिन्ही पदाधिका-यांचे अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज आकाराचे फोटो लावणे आवश्यक राहील.
- महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये किमान रु. १०,०००/- शिल्लक असणे आवश्यक आहे तसेच रक्कम कर्ज स्वरुपात दिली असल्यास किंवा ठेवीच्या स्वरुपात गुंतवणूक केली असल्यास त्याबाबतचा पुरावा सादर करणे बंधनकारक राहील.
- अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिका-याने प्रमाणित केलेली असावीत.
Bachat Gat Loan Maharashtra योजनेचे फायदे
स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली Bachat Gat Loan Maharashtra हि एक अत्यंत महत्वाची योजना आहे.
- या योजनेमुळे राज्यातील पुष्कळ बचत गट सदस्यना सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल.
- बचत गटातील महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हि योजना महत्वपूर्ण ठरेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- महिलांचा या योजनेअंतर्गत आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होईल.
- महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त व्याज दराने कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याज दरात म्हणजेच ४% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- परतफेडीचा कालावधी ३ वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे.
- आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
- महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
Mahila bachat gat loan साठी अर्ज कसा करावा?
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.लाभार्थ्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतील.
- अर्जदार सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे.
- अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यायची आहे.
Read more: https://govtschemesin.com/lek-ladki-yojana/