Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana। महाराष्ट्र सरकार देत आहे या पिकांसाठी संपूर्ण अनुदान. जाणून घ्या या लेखात.

Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana महाराष्ट्र सरकार द्वारे राबवली जाते.या योजनेअंर्तगत १६ प्रकारच्या फळबागांसाठी अनुदान दिले जाते. असे अनुदान मिळण्यासाठी कोकण विभागातील शेतकऱ्यांकडे १० गुंठे ते १० हेक्टर पर्यंतची शेत जमीन असणे आवश्यक आहे तसेच महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांसाठी कमीत कमी २० गुंठे ते जास्तीत जास्त ६ हेक्टर शेत जमीन असावी.

Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana

या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे तीन वर्षांच्या कालावधीत टप्या टप्याने मिळते. हे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होते. पहिल्या वर्षी ५०%, दुसाऱ्या वर्षी ३०% तर तिसऱ्या वर्षी २०% अनुदान देण्यात येते, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% आहे. जर हे प्रमाण कमी झाले तर लाभार्थी शेतकऱ्यास स्वखर्चाने नवीन झाडे आणून ते प्रमाण ठरलेल्या प्रमाणा प्रमाणे कायम ठेवणे बंधनकारक आहे.

१६ फळ झाडांचा समावेश या योजनेमध्ये आहे त्यांची नावे खालील प्रमाणे

  1. आंबा
  2. काजू
  3. पेरू
  4. सीताफळ
  5. डाळिंब
  6. नारळ
  7. चिंच
  8. अंजीर
  9. आवळा
  10. कोकम
  11. फणस
  12. चिक्कू
  13. जांभूळ
  14. मोसंबी
  15. संत्रे
  16. कागदी लिंबू

Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी दाखला.
  • आधार कार्ड.
  • शेत जमिनीचा ७/१२ आणि ८ अ चा उतारा.
  • आधार लिंक बँक खाते.

अधिकृत वेबसाइट : https://mahadbt.maharashtra.gov.in/

अर्ज कसा करावा

  • वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले सरकार DBT पोर्टल जावा.
  • तिथे शेतकरी योजना सेक्शन मध्ये जावा.
  • नंतर New Applicant रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन करताना तुमची माहिती जसे नाव, पत्ता, आधार नंबर, ईमेल आइडी वगैरे भरा.
  • हे झाल्यानंतर तुमचा यूज़र आइडी आणि पासवर्ड तयार करा.
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर यूज़र आइडी आणि पासवर्ड टाकून तुमच्या आकाऊंट ला लॉगिन करुन फॉर्म पूर्ण भरून घ्या, आता तुम्हाला तुमच्या शेतजमिनी बद्दल ची माहिती भरावी लागेल. सगळी माहिती भरली की फॉर्म १००% भरला जाईल.
  • पूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ज्या झाडांची लागवड केली आहे त्याची माहिती द्या आणि सर्वात शेवटी अर्ज करण्या फी भरा.

अधिक वाचा : https://govtschemesin.com/punjabrao-deshmukh-vasatigruh-bhatta/

Leave a Comment