CMEGP Scheme (Chief Minister Employment Generation Programme) ही महाराष्ट्र सरकार ची योजना आहे. नावा प्रमाणेच ही योजना राज्यात रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. लघू व माध्यम व्यवसाय उभारण्यासाठी क्रेडिट लिंक्ड सब्सिडी देणारी ही योजना, District Industries centers (DICs) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळातर्फे राज्य सरकारच्या आधिपत्या खाली राबवण्यात येते.
CMEGP Scheme Maharashtra
- उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी साठी जास्तीत जास्त 50 लाखांची मर्यादा या योजने अंतर्गत आहे.
- तसेच सेवा, शेती, शेती उत्पादन, ई व्हेईकल, माल वाहतूक अशा अन्य व्यवसायांसाठी ची मर्यादा 20 लाख रुपयांची आहे.
- व्यवसायाच्या प्रकरांनुसार लाभार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे त्या वर्गिकरणानुसार लाभार्थ्याचे चे योगदान ठरवले जाते. हे योगदान 5% ते 10% असते, उर्वरती रक्कम ही अधिकृत बँके कडून कर्ज स्वरुपात मिळते.
CMEGP Scheme Maharashtra Categories
लाभार्थ्याचे प्रामुख्याने चार प्रवर्गात या योजने अंतर्गत वर्गीकरण करण्यात येते त्या त्यानुसार त्याचे योगदान ठरते. खाली हे चार प्रवर्ग आणि त्यांचे योगदान याबद्दल ची माहिती दिली आहे.
प्रवर्ग | योगदान |
शहरी | 10% |
ग्रामीण | 15% |
खुला प्रवर्ग | 25% |
स्पेशल प्रवर्ग (या मध्ये sc/st/ महिला/ माजी सैनिक/ विकलांग/ vjnt/ obc/ minority यांचा समावेश होतो) | 5%,25%, 35% |
CMEGP Eligiblity
- अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षादरम्यान असावे. स्पेशल प्रवर्गासाठी (sc/ st/ obc/ महिला/ माजी सैनिक/ विकलांग )वयात 5 वर्षांची सूट मिळते.
- अर्जदार हा बेरोजगार असला पाहिजे व त्याला स्वतःचा व्यवसाय चालू करावयाचा असावा.
- अर्जदाराचे स्वतःचे तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची काहीही अट नाही.
- महिला व पुरुष कोणीही या योजने साठी अर्ज करू शकते.
- विवाहित तसेच अविवाहित उद्योजक अर्ज करू शकतात.
- 10 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवसाय उभारणी साठी अर्ज किमान शिक्षण इयत्ता सातवी पर्याणाचे शिक्षण झाले असावे. तसेच 25 लाखापेक्षा मोठ्या उद्योगासाठी अर्जदार हा किमान दहावी पास असणे अपेक्षित आहे.
- एका कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती या योजने साठी अर्ज करू शकतो.
- ज्या व्यक्तीनी PMRY, REGP, PMEGP किंवा अन्य कोणत्या क्रेडिट लिंक सब्सिडी स्कीम्स चा लाभ घेतला आहे ते CMEGP scheme चा लाभ घेऊ शकत नाहीत.
Application Process
- अधिकृत वेबसाईट : https://maha-cmegp.gov.in/ वर जाऊन अर्ज भरा.
- जिल्हा पातळीवर संबंधित विभागाकडून अर्जांची पडताळणी केली जाईल आणि पात्र उमेदवारांची प्राथमिक यादी बनवली जाईल.
- या पात्र उमेदवारांना DLTHC मंजुरी देईल व पुढे अधिकृत बँकेकडे अर्ज पाठवेल.
- बँक त्यावर sanction घेऊन disbursement करेल.
- नंतर बँक सब्सिडी साठी क्लेम करेल.
- HO लेवल वरुन सबसिडी क्लेम मंजूर झाला की nodal बँकेकडे डिसबर्समेंट केले जाते.
- 3 वर्षांच्या समाधानकारक व्यवसाय व कर्ज परतफेडी नंतर ही सबसिडी तुमच्या कर्ज खात्यात जमा होते.
CMEGP Documents
- पासपोर्ट साइज़ फोटो
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- घोषणा पत्र.
- व्यवसायाबद्दल ची कागदपत्रे.
- जातीचा दाखला (गरज असल्यास)
- स्पेशल केटेगरी सर्टिफिकेट (गरज असल्यास)
- पॅन कार्ड.
- जनगणना प्रमाणपत्र ( ग्रामीण प्रवर्गासाठी)
Read more: https://govtschemesin.com/driving-licence-new-rules-2024/