ENAM ata ghar baslya Vika l आता घर बसल्या विका तुमचा शेतमाल…!

ENAM ata ghar baslya Vika कसे ते जाणून घेण्या साठी सदर Article वाचा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

ENAM ( National Agriculture Market) म्हणजे इलिक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार. याची स्थापना एप्रिल २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा मंच शेतकरी आणि व्यापारी यांना जोडन्याचे काम करतो. या मंच्यावर संपूर्ण देश भरातून तब्बल १३८९ APMC ( Agriculture Produce & Livestock Market Committee) नोंद आहेत.

ENAM ata ghar baslya Vika

ENAM ata ghar baslya Vika

ENAM उद्देश्य

ENAM मंच तयार करण्या मागची उद्देश्य खालील प्रमाणे

  • देशातील सर्व शेतकरी आणि व्यापारी यांनी एकाच ठिकाणी व्यापार करावा.
  • संपूर्ण देशातील शेत मालाला समान भाव मिळवा.
  • शेत मालाच्या भावातील फरक कमी करून सर्व शेतकरी आणि व्यापारी यांना समान हक्क मिळावा.
  • घर बसल्या शेतकरी आपल्या मालाचे रजिस्ट्रेशन या पल्टफॉर्म वर करू शकतात, धान्य, फळे, भाजीपाला अशा निरनिराळ्या केटेगोरीज या प्लेटफॉर्म वरती आहेत.
  • देशातील सर्व APMC ( बाजारसमित्या ) ना एकत्रित करून देशपातळीवर एकच प्लेटफॉर्म तयार करून शेतमालाचा पारदर्शी लिलाव करणे.

ENAM Portal

ENAM ची अधिकृत वेबसाइट : https://www.enam.gov.in/web/

वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ENAM च्या अधिकृत पोर्टल वरती जाऊ शकता. या पोर्टल वरती वेगवेगळ्या केटेगोरीज केलेल्या आहेत जसे कमोडिटी जिथे सर्व शेत मालाचे रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येईल तसेच आधी रजिस्टर्ड असलेल्या मालाची माहिती इथे मिळेल.

प्रथमतः तुम्हाला पोर्टल वर स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

पोर्टल वर ऑनलाइन पेमेंट ची एक कॅटेगरी आहे ज्या मध्ये तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागते जेणे करुन तुमचा शेतमाल विकला गेल्यानंतर त्याचा मोबदला तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

ENAM चे मोबाईल एप्लीकेशन सुद्धा आहे.

ENAM टोल फ्री नंबर : १८००-२७०-०२२४. या नंबर वर कॉल करून तुमच्या शंका विचारून शकता.

ENAM registration

ENAM पोर्टल वर रजिस्ट्रेशन कसे करायचे जाणून घेऊ .

  • पोर्टल वरती e-registration नावाची टैब आहे त्यावर क्लिक करणे.
  • रजिस्ट्रेशन टॅब ओपन झाल्यानंतर तुम्ही विक्रेते आहात का ग्राहक आहात का व्यापारी आहात ते सेलेक्ट करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही स्वतः एक शेतकरी आहात का शेतकरी संघटना आहात हे सेलेक्ट करून पुढील माहिती भरावी.
  • संपूर्ण माहिती भरल्यांनंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर तुम्हाला रजिस्ट्रेशन आइडी आणि पासवर्ड येईल हा आइडी आणि पासवर्ड वरून तुम्ही ENAM पोर्टल वर लॉगिन करू शकता.

ENAM Documents

ENAM पोर्टल वर रजिस्ट्रेशन करताना खालील कागदपत्र महत्त्वाची आहेत.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक खात्याचे डिटेल्स
  • फोटोग्राफ

Leave a Comment