Loksabha Election phase3 साठी ७ मे ला मतदान होणार आहे. या संपूर्ण टप्यात १२ राज्यांतील ९४ मतदार संघांत मतदान होईल. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी १९ एप्रिल हे शेवटची तारीख होती. तिसऱ्या टप्प्यात गोवा, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमन ही राज्य आणि केंद्र शासित प्रदेश समाविष्ट आहेत.

Loksabha Election phase3 details
यंदाच्या लोक सभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ९५ जागांसाठी एकूण २९६३ अर्ज दाखल झाले आहेत, हे ९५ मतदार संघ १२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत विभागलेले आहेत. यातील जास्तीस्त जस्त मतदार संघ हे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत आहेत.
Loksabha Election phase3 महत्त्वाच्या तारखा
- निवडणुकीचा तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडेल.
- तिसऱ्या टप्यात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल होती.
- तसेच अर्ज परत घेण्यासाठी ची शेवटची तारीख २२ एप्रिल होती.
- या वर्षी ची संपूर्ण निवडणूक एकूण ७ टप्प्यांत होणार आहे.
- पहिला टप्प्यातील मतदान १९ एप्रिल ला झाले.
- निवडणुकीचा निकाल ४ जून ला कळवण्यात येईल.
तिसऱ्या टप्यातील राज्य, मतदार संघ आणि जागा यांची यादी
राज्य | मतदार संघ | मतदार संघाचे नाव |
आसाम | 4 | बारपेटा, धुबरी, गुवाहाटी, कॉकराझार |
बिहार | 5 | अररिया, झंझारपूर, खगारीआ, मधेपुरा आणि सुपौल |
छत्तीसगड | 7 | बिलासपुर, दुर्ग, जंजगिर चंपा, कोरबा, रायगढ, रायपूर, सुरगुजा |
गोवा | 2 | नॉर्थ गोवा, साउथ गोवा |
गुजरात | 26 | अहमदाबाद ईस्ट, अहमदाबाद वेस्ट, अमरेली, आनंद, बांसकंठा, बार्डोली, भारूच, भावनगर, छोटा, उदयपूर, दाहोद, गांधीनगर, जामनगर, जुनागढ, कच्छ, खेडा, माहेसाना, नवसरी, पंचमहाल, पाटण, पोरबंदर, राजकोट, साबरकंठा, सूरत, सुरेंद्रनगर, वडोदरा, वलसाद |
कर्नाटक | 14 | बागलकोट, बेळगाव, बेल्लारी, बिदर, बिजापूर, चिकोडी, दावनगिरी, धारवाड, गुलबर्गा, हवेरी, कोप्पल,रायचूर, शिमोगा, उत्तर कन्नडा |
मध्य प्रदेश | 8 | भिंड, भोपाळ, गुना, ग्वालियर, मरेना, राजगढ, सागर, विदिशा |
महाराष्ट्र | 11 | बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, माढा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर |
उत्तर प्रदेश | 10 | आग्रा, आओणला, बदौन, बरेली, एटाह, फतेपुर सिक्री, फिरोजाबाद, हाथरस, मैनपुरी, संभल |
पश्चिम बंगाल | 4 | जंगीपूर, मालदह दक्षिण, मालदाह उत्तर, मुर्शिदाबाद |
दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव | 2 | दादरा आणि नगर हवेली, दीव आणि दमान |
जम्मू आणि काश्मीर | 1 | अनंतनाग राजौरी |
तिसऱ्या टप्याची वैशिष्ट्ये
या टप्यात सर्वात जास्त 658 अर्ज हे गुजरात च्या 26 मतदार संघातून आले तर त्या खालोखालो महाराष्ट्रातील 11 मतदार संघातून 519 अर्ज आले. निवडणूक आयोगाच्या माहिती नुसार सगळ्यात जास्त 77 अर्ज महाराष्ट्रातील उस्मानाबाद मतदार संघातून आले तर त्यांनंतर छत्तीसगड च्या बिलासापूर मतदार संघातून 68 अर्ज दाखल झाले.
मध्य प्रदेश मधील बेतूल मतदार संघाचे मतदान हे दुसऱ्या टप्यात होणार होते परंतु तेथील BSP उमेदवारांच्या मृत्यू मुळे ते तिसऱ्या टप्यात घेण्यात येणार आहे.
आठ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले, कांग्रेस च्या उमेदवारांची उमेदवारी रद्द कण्यात आली तर गुजराच्या सुरात मतदार संघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोधी निवडून आले.
अधिक वाचा https://govtschemesin.com/enam-ata-ghar-baslya-vika/