Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana

Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta या योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी पुढील लेख वाचा आणि आम्हाला तुमचा अभिप्राय आवश्य कळवा. Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana ही महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे राबवली जाते. या योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येते. व्यावसायिक आणि अव्यावसायिक दोन्ही अभ्यासक्रमांसाठी या योजने अंतर्गत भत्ता मिळतो.

Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta

Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta फायदे

Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta योजनेचे फायदे हे लाभार्थी शिक्षण घेत असलेल्या संथ्येच्या ठिकाणावर अवलंबून आहेत. ते कसे ते पुढे पहा.

व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

  • जर अर्जदार हा अल्पभूधारकाचा अपत्य असेल आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, आणि अर्जदार शिक्षण घेत असलेली संस्था ही मुंबई महानगर पालिका, पुणे महानगर, नागपूर शहर, औरंगाबाद शहर या शहरांत असेल तर त्या अर्जदारास रुपये ३०,००० चा वसतिगृह भत्ता मिळतो.
  • वरती दिलेल्या शहरांना सोडून इतर ठिकाणी असलेल्या संथा तील विद्यार्थ्यांना २०,००० रुपयांचा भत्ता मिळतो.
  • ज्या विद्यार्थांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख पेक्षा कमी आहे, जे अल्पभूधारक विद्यार्थी आहेत अशा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी शिकत अव्यवसायिक अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांना १०,००० रुपयांचा भत्ता मिळतो.
  • तसेच वरील चार शहरे सोडून इतर शहरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ८,००० रुपयांचा भत्ता मिळतो.
  • ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उतप्पान १ ते ८ लाख आहे अशा मुंबई, पुणे, नागपूर ,औरंगाबाद शहरांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला १०,००० रुपयांचा भत्ता मिळतो.
  • इतर शहरांमधील विद्यार्थ्यांना ८००० रुपये मिळतात.
  • प्रत्येक जिल्हा मध्ये ५०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो या मधे ३३% जागा या महिलांसाठी राखीव असतात, जर महिलांनी अर्ज केला नाही किंवा तेवढ्या महिला उपलप्ध नसतील तर त्या जागा मुलांना मिळू शकतात.

अव्यवसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यां साठी

ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबीक वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना २००० रुपयांचा भत्ता मिळतो.

पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  • अर्जदारास उत्पन्नाचा दाखला जमा करणे अनिवार्य आहे.
  • फक्त खुल्या तसेच SEBC प्रवर्गातून एडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी च ही योजना राबवण्यात येते.
  • व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी हे अल्पभूधारक असले पाहिजेत तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखानपेक्षा कमी असले पाहिजे.
  • अव्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे १ लाखापेक्षा कमी असले पाहिजे.
  • शासनाच्या नियम नुसार एका घरातील पहिली दोन अपत्येच Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • अर्जदार हा सरकारी वसतिगृह, खाजगी वसतिगृह अथवा भाडे तत्वावर राहत असावा.
  • संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधी मध्ये विद्यार्थ्याचा २ वर्षांचा गैप येऊ नये.
  • अर्जदार विद्यार्थ्याने प्रत्येक सहा माही व वार्षिक परीक्षा दिलीच पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

  1. अर्जदार विद्यार्थ्याने अधिकृत संस्थेचा रहिवासी दाखला जमा करने अनिवार्य आहे.
  2. उत्पन्नाचा दाखला तसेच अल्पभूधारक असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे.
  3. जिथे राहता त्या वसतिगृह अथवा भाडतत्वचा पुरावा.
  4. B.ed, Law, B.Ped, M.Ped अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी CAP संदर्भातली कागदपत्र प्रस्तुत करावे.
  5. जर कधी शैक्षणिक गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट जमा करावे.
  6. जसे आधी पहिले की या योजनेचा लाभ कुटुंबातील पहिल्या दोन अपत्यांनाच मिळतो म्हणून दोन अपत्य असलेला दाखला प्रस्तुत करावा लागतो.
  7. शिक्षण संस्थेचे हजेरी पत्रक.
  8. मागच्या वर्षीचा निकाल.

अधिकृत वेबसाइट : https://mahadbt.maharashtra.gov.in/

अधिक वाचा : https://govtschemesin.com/lek-ladki-yojana/

https://govtschemesin.com/enam-ata-ghar-baslya-vika/

Leave a Comment